बालमित्रांनी तयार केल्या इको गणेशमूर्ती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - एका मातीच्या गोळ्याबरोबर दुसरा गोळा तयार करत आज तीन तासात अडीचशेहून अधिक बालमित्रांनी इको गणपतीमूर्ती तयार केली. "सकाळ' एन.आय.ई.च्या वतीने आयोजित इको गणपती कार्यशाळेत बालमित्रांनी ही धम्माल केली. गांधी मैदानच्या पॅव्हेलियन हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली. मंगेश कुंभार यांनी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखविले. 

कोल्हापूर - एका मातीच्या गोळ्याबरोबर दुसरा गोळा तयार करत आज तीन तासात अडीचशेहून अधिक बालमित्रांनी इको गणपतीमूर्ती तयार केली. "सकाळ' एन.आय.ई.च्या वतीने आयोजित इको गणपती कार्यशाळेत बालमित्रांनी ही धम्माल केली. गांधी मैदानच्या पॅव्हेलियन हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली. मंगेश कुंभार यांनी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखविले. 

मी पण गणेश मूर्ती तयार करू शकतो, हा आत्मविश्‍वास बालमित्रांत जागा करण्याचे काम आज एनआयईच्या कार्यशाळेतून देण्यात आला. सकाळी साडेनऊच्या सुमारास कार्यशाळेला प्रारंभ झाला. बालमित्रांना मातीचे गोळे व इतर साहित्य देण्यात आले. पाट, तीन गोळे यांच्या साहाय्याने गणपती आकाराला येऊ लागला. बालमित्रांना प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन करत मंगेश कुंभार यांनी गणपती कसा आकाराला येऊ शकतो, याचे सादरीकरण सोप्या पद्धतीने केले. यामुळे बालमित्रांनी अतिशय उत्सुकतेने गणपतीची मूर्ती आकाराला आणली. साधारण चार टप्प्यांत मूर्ती तयार केली. 

बालमित्रांची जिज्ञासा आणि त्यांचे कौशल्य येथे प्रत्येक क्षणाक्षणाला दिसून येते होते. बैठी रूपातील मूर्तीचे प्रात्यक्षिक सर्वांना दाखविले. यानंतर बालमित्रांनी झोपाळ्यावरील मूर्ती, पाटील गणपती, दगडू शेट रूपातील मूर्ती तयार करून एक आगळा आनंद मिळविला. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचे फोटो मूर्तीबरोबर काढून व्हाटस ऍप ग्रुपवर शेअर केले. "सकाळ'चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्या हस्ते मंगेश कुंभार आणि ईशान स्टेशनरीच्या सारिका भलानी यांचे स्वागत केले. 

मूर्ती सजल्या 
गणपती मूर्तीबरोबरच फुलदाणी, मोदक, आरतीचे ताट बालमित्रांनी तयार करून आपल्या कौशल्याचे सादरीकरण कार्यशाळेत केले. काही बालमित्रांनी घरातून टिकल्या, रंग बरोबर आणले होते. त्यातून त्यांनी स्वतः तयार केलेल्या मूर्ती आणखी सजविल्या. यामुळे कार्यशाळेतील उत्साहात आणखी भर पडली. 

ईशान मॉलविषयी... 
राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील ईशान स्टेशनरी मॉल कार्यशाळेचे प्रायोजक होते. स्टेशनरी क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या ईशान मॉलच्या सारिका भलाणी यांचे विशेष सहकार्य मिळाले. शालेय, कार्यालयीन, बॅंकिंग कामकाजासाठी उपयुक्त दर्जेदार स्टेशनरी साहित्याचे विक्री केंद्र म्हणून "ईशान'ची ख्याती आहे. 

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आता प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेला याच उद्देशाने ईशान स्टेशनरी मॉलचे नेहमीच सहकार्य असते. या कार्यशाळेतून मुलांच्या कलाविष्काराची अनुभूतीही मिळते. 
-सारिका भलाणी