कऱ्हाड परिसरात नऊ लाखांचा मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

कोल्हापूर - मौजे शिवडे (ता. कऱ्हाड) गावातील एका खोलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून नऊ लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला. त्याचबरोबर शेणोली येथे अवैध ताडीविक्री केंद्रावर छापा टाकून 135 लिटर ताडी जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या संशयितांची नावे गौरव कैलास अर्जुगडे (वय 25, रा. हनुमानवाडी, ता. कऱ्हाड), नंदकुमार प्रकाश कडव (वय 32, रा. आगाशिवनगर मलकापूर, कऱ्हाड) आणि बानू कृष्णा बड्यावार (वय 22, मूळ रा. हैदराबाद, सध्या रा. शेणोली, ता. कऱ्हाड) अशी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील महामार्गांलगतच्या 50 मीटर अंतरावरील मद्यविक्रीची दुकाने बंद झाली आहेत. सुमारे 75 टक्के दुकाने बंद झाल्यामुळे मद्याला मोठी मागणी सुरू झाली. याचाच फायदा उठवून शिवडे (ता. कऱ्हाड) गावात देशी मद्याची विक्री करण्यासाठी साठा केला जात असल्याची माहिती निरीक्षक युवराज शिंदे यांना मिळाली. काल सायंकाळी या गावातील जी. एस. नर्सरीजवळील एका बंदिस्त खोलीवर पथकाने छापा टाकला.

पश्चिम महाराष्ट्र

सुपे (नगर) पारनेर (जि. नगर) तालुक्यात आज (बुधवार) सर्वत्र पाऊसाने जोरदार हजेरी लावली. सुपे परीसरातही जोरदर पाऊस झाल्याने हंगा...

07.33 PM

पाथर्डी (नगर): विहरीवर धुणे धुत असताना विहिरीचा कठडा खचल्याने ऋृतुजा विष्णु हिंगे (वय 16 वर्षे) ही विद्यार्थ्यीनी विहरीत पडून...

07.21 PM

साडेपाच लाखाला कंपनीला ठेकेदारानेच घातला गंडा, गुन्हा दाखल श्रीगोंदे (नगर): महावितरणच्या बेलवंडी उपविभागातील गावातील वाणिज्य व...

07.03 PM