पूरस्थितीत गर्भवती, कुपोषित बालक लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

जिल्हा परिषद अध्यक्षा - साथरोग नियंत्रणासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज

कोल्हापूर - पूरस्थितीत गर्भवती, तीव्र व मध्यम कुपोषित बालके आणि विकलांग रुग्ण यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. आवश्‍यकता भासल्यास त्यांना स्थलांतर करण्याचे नियोजनही केले आहे. साथरोग नियंत्रणासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

आरोग्य विभागातील आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू राहणार असून त्यासाठी मुख्यालयातील २५ कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. २ ऑक्‍टोबरअखेर हा कक्ष कार्यरत राहणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कक्ष स्थापन केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग नियंत्रण कक्ष सुरू आहे. आरोग्य सेवक, सेविका, सहायक यांच्यावरती जबाबदारी निश्‍चित केली आहे. एकूण १२९ पूरग्रस्त गावे व २१० जोखीमग्रस्त गावातील सर्वाना आपत्कालीन काळात औषधोपचार करणेबाबत नियोजन केले आहे. 

संभाव्य पूरग्रस्त गावासाठी ५९ वैद्यकीय अधिकारी, ६४ आरोग्य सहायक, ८५ आरोग्य सेवक, १०३ आरोग्य सेविका असे मिळून ३११ अधिकारी कर्मचारी यांना पूरग्रस्त गावासाठी आदेशित केले आहेत. अद्ययावत वाहन व औषधे इत्यादी वैद्यकीय पथकात समावेश केला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेद्र स्तरावर आवश्‍यक तो जलजन्य व किटकजन्य औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे. 

शासनाच्या सूचनेनुसार साथरोग नियंत्रण कीट अद्यावत करणेत आले आहेत. तसेच संभाव्य पूरपस्थिती उद्‌भवल्यास जिल्ह्यातील संपर्क तुटणाऱ्या प्रा.आ.केंद्र अंतर्गत गावासाठी अतिरिक्त दोन ठिकाणी अतिरिक्त औषधसाठा ठेवला आहे.

दृष्टिक्षेपात यंत्रणा
आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू.

मुख्यालयातील २५ कर्मचारी नियुक्त.

२ ऑक्‍टोबरअखेर हा कक्ष कार्यरत.
१२९ पूरग्रस्त गावांवर लक्ष