शेतीमाल खासगी कंपन्यांनी खरेदी करण्यासाठी प्रयत्न - पालकमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात जातो. त्याला जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी खासगी कंपन्यांनी शेतीमाल खरेदी करावा, याबाबत शासन विचार करीत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

कोल्हापूर - हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात जातो. त्याला जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी खासगी कंपन्यांनी शेतीमाल खरेदी करावा, याबाबत शासन विचार करीत आहे. यातून स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, हा या मागचा उद्देश असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

कणेरी येथे एका कार्यक्रमावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनेकदा चांगले उत्पादन निघूनही त्याची विक्री कमी भावाने होत असल्याने शेतकरी अडचणी जातो. हे टाळण्यासाठी सरकार काही कंपन्यांशी संपर्क साधून संबंधित शेतमाल हमीभावाने घेण्याबाबत प्रयत्न करणार आहे. या कंपन्या जादा दराने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केल्यास इतर व्यापाऱ्यांनाही हमीभावाने तो खरेदी करावा लागेल. 

दीड रात्रीत घडामोडी होऊ शकतात
माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. याबाबत बोलताना श्री. पाटील यांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतलेली नाही. निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा कालावधी आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. याबाबतच्या घडामोडी दीड रात्रीतही होवू शकतात, असे ते म्‍हणाले.