परतीच्या पावसाने कोल्हापूरला झोडपले

सुनील पाटील
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

काल पासून जिल्ह्यातील शिरोळ, राधानगरी, करवीर, हातकंगले तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता. आज कोल्हापुर शहरासह आसपासच्या उपनगर व् गावात  पावासने झोड़पुन काढले. दुपारी अडीच पर्यंत अंगाची लाही-लाही करणारे उन होते.

कोल्हापुर: विजांच्या कड़कड़ासह शहरात परतीच्या पावसाने झोड़पुन काढले. दुपारी पावणे तीनला सुरु झालेल्या पावसाने पंधरा मिनिटांत शहरात पाणी -पाणी केले. तर वाहतूकदारांची तारांबळ उडाली.

काल पासून जिल्ह्यातील शिरोळ, राधानगरी, करवीर, हातकंगले तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता. आज कोल्हापुर शहरासह आसपासच्या उपनगर व् गावात  पावासने झोड़पुन काढले. दुपारी अडीच पर्यंत अंगाची लाही-लाही करणारे उन होते.

त्यानंतर अचानक दाटून आलेल्या आभाळाने ढगांच्या गडगडाटासह जोरदार बरसायला सुरुवात केली. यामुळे, रस्त्यावर खाद्य पदार्थ विकणार्यांची तसेच भाजी विक्रीत्यांची तारांबळ उडाली. दुपारी सव्वातीन नंतर ही पावसाचा जोर कायम राहिला.