मनपाची आता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - मनपा शिष्यवृत्तीचे आता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती असे नामकरण करण्यात आले आहे. शिष्यवृत्तीची रक्कमही दुप्पट झाली असून 25 विद्यार्थ्यांना 1200 ऐवजी 2400 रुपये मिळणार आहेत. 

कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याच्या छत्रपती शाहू महाराज यांच्या आदेशास यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. 21 ते 23 सप्टेंबरअखेर यानिमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. 21 सप्टेंबरला प्रभातफेरी होईल. 22 व 23 ला दोन दिवसांचे प्राथमिक शिक्षणावर व्यापक असे चर्चासत्र होईल. 

केंद्र सरकारने नुकताच शिक्षण हक्क कायदा केला आहे. शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वीचे प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व ध्यानात घेऊन सक्तीचा कायदा केला होता. महापालिका शाळांची ओळख अलीकडे बदलू लागली आहे. अशा शाळांत कोण प्रवेश घेणार, ही मानसिकता बदलून मनपा शाळांनाही "अच्छे दिन' आले आहेत. यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत टेंबलाईवाडी विद्यामंदिरचा विद्यार्थी राज्यात पहिला आला आणि या शाळांचे महत्त्व अधोरेखित झाले. ठराविक शाळांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीत चमकतात. ज्या शाळांत विद्यार्थी संख्या कमी आहे तेथील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश का मिळवत नाहीत, असा प्रश्‍न प्रशासनाला पडला. त्यातून कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

मनपाच्या 59 शाळांतून दहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जरगनगर, टेंबलाईवाडी, वीर कक्कया विद्यालय, जवाहरनगर, अण्णासाहेब शिंदे विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, प्रिन्स शिवाजी विद्यालय या शाळांनी गुणवत्ता राखली आहे. त्यांच्यासोबत अन्य शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पूर्वी एका विद्यार्थ्याला बाराशे रुपये रक्कम दिली जात होती. आता 2400 इतकी रक्कम एकाचवेळी दिली जाणार आहे. यामुळे साठ हजारांचा बोजा तिजोरीवर पडणार आहे. 

आजच्या सभेसमोर विषय ठेवणार 
छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया ज्या संस्थानात रचला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन मनपा शिष्यवृत्ती ऐवजी शाहू महाराज शिष्यवृत्ती असे नामकरण होणार आहे. प्राथमिक शिक्षण समितीने मंजुरी दिली आहे. उद्याच्या (ता. 19) सर्वसाधारण सभेसमोर ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.