रांगणा किल्ल्यास गतवैभव प्राप्त होणार  - आमदार प्रकाश आबिटकर

रांगणा किल्ल्यास गतवैभव प्राप्त होणार - आमदार प्रकाश आबिटकर

कडगाव - भुदरगड तालुक्‍यातील रांगणा किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुरातन खात्याकडून निधी प्राप्त झाल्याने गडास गतवैभव प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

ऐतिहासिक रांगणा किल्ल्यासाठी पुरातन विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामाचा प्रारंभ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. पुरातत्त्व खात्याचे सहायक संचालक विलास वहाणे प्रमुख उपस्थित होते. 

आमदार आबिटकर म्हणाले, ‘‘भुदरगड तालुक्‍याच्या सरहद्दीवर असणाऱ्या रांगणा किल्ल्यास दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. तरुणाईकडून पिकनिक पॉईन्ट म्हणून ऐतिहासिक ठिकाणांना पसंती दिली जात आहे. इतिहासाची साक्ष देणारे हे किल्ले आता गिर्यारोहण व पर्यटन यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत. हौशी पर्यटक व ट्रेकर्स तसेच व्यावसायिक ट्रेकिंग ग्रुप्स मोठ्या संख्येने किल्ल्यांना भेट देतात. त्यामुळे या गडाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे; पण काळाच्या ओघात गडाची अनेक ठिकाणी पडझड झाली. रांगणा किल्ल्यास पाच कोटींचा निधी मिळाल्याने याचे सवंर्धन होणार असून, भविष्यात या भागातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल,’’

या वेळी पुरातत्त्व खात्याचे संचालक वहाणे म्हणाले, ‘‘चार टप्प्यात काम होणार आहे. पहिल्या टप्प्यात किल्याचा अंतर्गत भागातील रांगणा देवी मंदिर, गणेश मंदिर, राजवाडा, महादेव मंदिर तसेच आतील स्मारके व तलाव यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे,’’ संग्राम सावंत यांनी स्वागत केले. या वेळी सत्यजित जाधव, बाबा नांदेकर,रामेश्‍वर निपाणे, संजय दळवी, उत्तम कांबळे वनक्षेत्रपाल एस. एस. पाटील, संदीप वरंडेकर, मानसिंग पाटील, विश्‍वजित जाधव, शेखर पोतदार, मंदार म्हाडगुत, प्रकाश लाड, सिद्धेश लाड, संदीप कांबळी, आंनदा ढोकरे, केळस्कर, अमित वर्दम आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com