कोल्हापूर प्रादेशिक विकास आराखड्यातील त्रुटी दूर करण्यासाठी समिती

कोल्हापूर प्रादेशिक विकास आराखड्यातील त्रुटी दूर करण्यासाठी समिती

कोल्हापूर - कोल्हापूर प्रादेशिक नगर विकास आराखड्याबाबत महसूलमंत्री व नगरविकास राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व पाच हजार ३९० हरकतींची फेरसुनावणी घेतली जाणार आहे. तसेच, आराखड्यातील त्रुटी दूर करण्यासाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाल्याची माहिती भारतीय किसान संघाचे प्रदेशमंत्री मदन देशपांडे यांनी दिली.

प्रादेशिक विकास आराखड्याबाबत अनेक हरकती आहेत. भारतीय किसान संघाने या विरोधात आवाज उठविला आहे. भारतीय किसान संघाच्या पाठपुराव्यामुळे आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय किसान संघाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. कोल्हापूर प्रादेशिक नगर विकास आराखड्यात त्रुटी राहिल्याने अनेक नागरिक, शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

बाधितांचे म्हणणे ऐकले नसल्याने व नैसर्गिक न्यायतत्त्वांचा अवलंब न करता एकतर्फी निर्णय घेतला गेल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर सर्व हरकतदारांची फेरसुनावणी घेण्यासह नगररचना विभागाचे संचालक आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. कोणत्याही स्थितीत बाधीत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता नगरविकास विभागाने घ्यावी, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

श्री. देशपांडे यांच्यासह भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष बाळगोंडा पाटील, तालुकामंत्री उमाशंकर मोहिते, चंद्रशेखर मोळदी, के. डी. पाटील, मलगोंडा पाटील, प्रमोद धनवडे, नगरविकास विभागाचे सहसंचालक अविनाश पाटील, सहसचिव श्री. लांडगे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com