राजर्षी शाहू जंगल पुनर्निर्माण अभियानास ‘सकाळ’ची साथ

राजर्षी शाहू जंगल पुनर्निर्माण अभियानास ‘सकाळ’ची साथ

‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची ग्वाही - सव्वालाख झाडे लावण्याचा संकल्प

कोल्हापूर - जंगल निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून राजर्षी छत्रपती शाहू प्रेरित पारंपरिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियानाला सकाळ सोशल फाउंडेशनची नेहमीच साथ असेल. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. 

या वेळी ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, ‘सकाळ’चे संचालक भाऊसाहेब पाटील, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, मुख्य बातमीदार निखिल पंडितराव उपस्थित होते. 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लोकसहभागातून राजर्षी छत्रपती शाहू प्रेरित पारंपरिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियान राबविण्यात येत आहे. उद्योगपती चंद्रकांत जाधव यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यकर्ते निवास साळोखे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सव्वालाख जंगली झाडांची निर्मिती करून त्या रोपांची लावण करण्यात येणार आहे. शाश्‍वत पर्यावरणाच्या  विकासासाठी उचललेल्या या पावलांमध्ये ‘सकाळ’चा सहभाग असणे आवश्‍यक असल्याने आज निवास साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार यांना भेटले. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘कोल्हापुरात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. ही ऊर्जाच सामाजिक कामात यश देते. सकाळच्या तनिष्काचा प्रारंभ कोल्हापुरात झाला आणि या माध्यमातून राज्यात आदर्श होईल, असे काम उभे राहिले आहे. राज्यातील ५५० गावांमध्ये पाण्याचा प्रश्‍न या तनिष्काच्या माध्यमातून सुटला असून, ही गावे आता जलसाक्षर बनली आहे.

समाजासाठी सर्वांनी एकत्र येऊन बदल केल्यास निश्‍चित शाश्‍वत विकास करता येतो. यासाठी सकाळ नुसते सांगत नाही, तर स्वतः पुढाकार घेतो आणि करून दाखवतो. जलयुक्त शिवार ही योजना याचेच प्रतीक आहे.

‘सकाळ’ सोशल फाउंडेशन नेहमीच समाजाच्या हिताची भूमिका घेऊन काम करत आला असून, चांगल्या गोष्टी पुढे आणण्याचे काम यातून केले आहे. या अभिनयाच्या पाठीशी ‘सकाळ’ सोशल फाउंडेशन ठामपणे उभे राहिल.’’ 

या वेळी वनरक्षक सुरेश चरापले, वनपाल प्रदीप बोडके, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, शिवसेनेचे हर्षल सुर्वे, शिवानंद पिसे, प्रकाश पाटील, बापूसाहेब मोटे, धुळा रामण्णा, राजू लखाणे, कल्लाप्पा पाटील, अजय गुरव, बाळासाहेब मोटे, अशोक चिमटे, दीपक परोडकर, सुनील नागराळे, सुनील मोरे, महादेव कांबळे उपस्थित होते.

सकाळ सोशल फाउंडेशनची ऊर्जा हवी
श्री. साळोखे म्हणाले, ‘‘राजर्षी शाहूंचा विचार घेऊन या भूमीमध्ये काम करत असून, पर्यावरणचा समतोल टिकवण्यासाठी राजर्षी शाहूंच्या विचारातूनच लोकसहभागातून वृक्षारोपणाची चळवळ हाती घेतली आहे. नुसते झाडे लावा, असे न करता जंगली वृक्षांचे संवर्धन आणि पुनर्निर्माण करण्याचे ठरवले आहे. यासाठी सकाळ सोशल फाउंडेशनची ऊर्जा हवी आहे. ‘सकाळ’ सोशल फाउंडेशन या उपक्रमात असेल, तर निश्‍चित हिरवाई अवतरेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com