कृष्णेत स्नान करणाऱ्या भाविकांना सुरक्षा पुरवण्याची गरज

जितेंद्र आणुजे
गुरुवार, 7 जून 2018

नृसिंहवाडी -  श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आज अधिक मास व गुरुवार निमित्त दत्त मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती .आज अनेक भाविकांनी स्नानाची पर्वणी साधली. काही दिवसापूर्वी बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे मात्र येथील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. कृष्णा घाटावर स्नान करणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षा ठेवण्याची गरज आता वाटू लागली आहे. 

आज गुरुवार व अधिक मासानिमित्त नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर भाविकांनी फुलून गेले होते. दर्शनापूर्वी अनेक भाविकांनी कृष्णा पात्रात स्नान केले. दर्शनासाठी येणारा भाविक स्नान करूनच दर्शन घेतो ही येथील परंपरा आहे. काहींनी आज अधिक मासानिमित्त नदी पात्राला नारळ व पणती अर्पण केले व महापूजेचा आनंद घेतला. कृष्णा घाटावर स्नानाच्या सुरक्षा व्यवस्थांपैकी कोणतीच सुविधा आज इथे नसल्यामुळे अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

भाविकांना स्नान करताना या ठिकाणी कोणती सुरक्षा व्यवस्था नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .कृष्णा नदी घाटाच्या बाजूला स्नान करता न येणाऱ्या भाविकांसाठी साखळदंड, वायररोप, रबरी इनर, लाइफ जॅकेट, गर्दीच्या वेळी फिरते सुरक्षा रक्षक, कन्यागत पर्व काळातील जाळ्या आधी व्यवस्था स्नानासाठी करणे गरजेचे आहे. कोणतीच व्यवस्था इथे  नसल्यामुळे व स्त्री पुरुषांना स्नानानंतर कपडे बदलण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे भाविकांतून कमालीचे नाराजी व्यक्त होत आहे .

भाविकांच्या कृष्णा नदीपात्रातील स्नानाच्या पार्श्वभूमीवर लागणारी रबरी इनर, लाइफ जॅकेट, पर्वकाळातील जाळ्या ,दोरखंड यांची तरतूद त्वरित करू. मात्र ज्या भाविकांना स्नान करता येत नाही अशा भाविकांनी नदीपात्रात न जाता पायरीवर बसून स्नान केल्यास जीवास धोका पोहोचणार नाही
 - विकास पुजारी 

अध्यक्ष, दत्त देवस्थान अध्यक्ष, नृसिंहवाडी 

Web Title: Kolhapur News security on the bank of Krishna River