प्लास्टिक पिशव्यांनी शहर तुंबले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

कोल्हापूर - ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’ हे केवळ पोस्टरवरच दिसत असल्याचे वास्तव आज पुन्हा एकदा पुढे आले आहे. शहरात रोज सुमारे साडेचार टन प्लास्टिक कचरा मिळत असल्याचे नाले सफाई मोहिमेतून दिसून आले आहे. नागरिकांनी फेकलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळेच गटार आणि नाले तुंबत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्लास्टिकचा वापर कमी झाला तर नक्कीच शहर स्वच्छ होण्यास मदत होईल.

महानगरपालिकेने उशिरा का होईना नाले सफाईचे काम हाती घेतले आहे. शहरात छोटे नाले सफाईचे काम सुरू असताना तेथे कचरा कमी आणि प्लास्टिकच अधिक दिसून येत आहे. यंत्राद्वारे छोटे नाले 

सफाईचे काम सध्या कसबा बावड्यात सुरू आहे. तेथे एका छोट्या नाल्यातून मिळालेला गाळामध्ये ८० टक्के प्लास्टिकच असल्याचे दिसून आले. अशीच परस्थिती इतर ठिकाणी आहे. शहरात रोज सुमारे १८० ते १९० टन कचरा तयार होतो. त्यापैकी ओला कचरा ११० टन तर उर्वरित ८० टक्के कचरा हा सुका असल्याचे महापालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. सध्या सुरू असलेल्या नाले सफाई मोहिमेत रोज साडेचार टन कचरा केवळ प्लास्टिकचाच असल्याचे दिसून येते.

महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी शहराला कोंडाळा मुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. कचरा मुक्त कोल्हापूर हे त्यांचे व्हिजन आहे. यासाठी ते प्रयत्न करीत असतानाच हे भीषण सत्य समोर आले आहे. 

आकडे बोलतात...
एकूण प्रभाग 81

एकूण नाले 476

सफाई केलेले नाले 256

रोजचा जमा कचरा १९० टन

रोज मिळणारे प्लास्टिक ४।। टन