फिर्यादी पाटील यांची घेतली उलट तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - बहुचर्चित तत्कालीन महापौर तृप्ती माळवी यांच्या लाच प्रकरणाच्या खटल्यात आज फिर्यादी संतोष पाटील यांचा संशयिताच्या वकिलांनी उलटतपास घेतला. जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी २८ ऑगस्टला होणार असल्याचे वकील ए. एम. पिरजादे यांनी सांगितले.

महापालिकेने ताब्यात घेतलेली जागा मूळ मालकाला परत देण्याच्या ठरावावर सही करण्यासाठी माळवी व त्यांचे खासगी स्वीय सहायक अश्‍विन गडकरी यांनी लाच मागितल्याची तक्रार शिवाजी पेठेतील संतोष पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीनुसार ३० जानेवारी २०१५ ला सायंकाळी माजी महापौर तृप्ती माळवी यांना त्यांच्या हस्तकामार्फत लाच घेत असताना अधिकाऱ्यांनी पकडले होते. त्यानंतर महापौरांचा स्वीय सहायक गडकरी याला अटक झाली होती. दरम्यान, माळवी यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर त्यांना अटक केली होती.

आज याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश बिले यांच्या न्यायालयात झाली. फिर्यादी संतोष पाटील यांचा उलट तपास संशयिताचे वकील परदेशी आणि ॲड. राजेंद्र भोसले यांनी घेतला. याबाबतची न्यायालयाने पुढील सुनावणी २८ ऑगस्टला ठेवली असल्याचे ॲड. पिरजादे यांनी सांगितले.