कोल्हापूर: उदगावमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

अरुणा बाबुराव निकम (वय 56) यांना ठार करण्यात आले. तर बाबुराव नारायण निकम यांना गंभीर इजा करण्यात अाली आहे. तर या दरोडा टाकून 24 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच रोख रक्कम 50 हजार यामध्ये लंपास करण्यात आले.

उदगांव (जि. कोल्हापुर) : येथील उदगांव -शिरोळ मार्गावर मदरशाजवळ असलेल्या निकम मळयात बाबुराव नारायण निकम याच्या घरावर मध्यरात्री दरोडा पडला. दरोडेखोऱ्यांचा हल्ल्यात एक महिला ठार झाली असून, एक पुरुष जखमी झाला आहे. तर, 24 तोळे सोने लंपास करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणा बाबुराव निकम (वय 56) यांना ठार करण्यात आले. तर बाबुराव नारायण निकम यांना गंभीर इजा करण्यात अाली आहे. तर या दरोडा टाकून 24 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच रोख रक्कम 50 हजार यामध्ये लंपास करण्यात आले.

विशेषतः घरात दोन मुले सुना व नातवडे असताना हा दरोडा घालण्यात आला. त्यामुळे उदगांव परीसरात भीतीचे वातावरण आहे.