पाण्यातून अळ्या आल्याने सुभाषनगरात रास्ता रोको

पाण्यातून अळ्या आल्याने सुभाषनगरात रास्ता रोको

कोल्हापूर - अळीमिश्रित पाणी पुरवठ्यामुळे संतापलेल्या सुभाषनगर, सरनाईक वसाहतीतील नागरिकांनी नगरसेविकेसह आज अचानक रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनस्थळी आलेले महापालिकेचे आरोग्याधिकारी व जलअभियंत्यांना घेराओ घालून प्रश्‍नांचा भडिमार केला.

सुभाषनगर, सरनाईक वसाहत, यादव कॉलनी परिसरात अळीमिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने डेंग्यूच्या साथीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दखल घेतली गेली नाही. अळीमिश्रित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त वहिदा सौदागर, मिजबा जमादार, कल्पना कदम, सलीम बेग, साद मुजावर  यांच्यासह नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. पाणी पुरवठामध्ये सुधारणा करण्याची मागणी करत आंदोलक रस्त्यावर उभे राहिले.

आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्यावर नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पाटील यांनी आपण डॉक्‍टर असून इतक्‍या रुग्ण डेंग्यूचे नसल्याचे सांगितले. या प्रकरणाची दखल घेऊन महापालिकेने उपाययोजना सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्ग्याधिकारी पाटील म्हणाले, या भागात पाणीसाठा करण्यासाठी जुने बॅरल मोठ्या प्रमाणात वापरले जातात. डेंग्यूचे डास संथ ताज्या पाण्यात कसे होतात याबाबतचे प्रबोधन केले जात आहे. महापालिकेने धूर, औषध फवारणी मोहीम या भागात सुरू केली आहे. 

गटारीचे सांडपाणी येथे कोठेतरी क्रॉसिंग होऊन मिसळत असल्याने त्याचा शोध सुरू ठेवला आहे. त्यासाठी दुरुस्ती करावी लागणार आहे. खर्चाचा काही भाग नागरिकांनी उचलावा लागणार आहे.
सुरेश कुलकर्णी,
जल अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com