अंबाबाईची चांदीची मूर्ती देवस्थानकडे

सराफ संघातर्फे प्रदान; मूर्तीची नगरप्रदक्षिणा, नागरिकांचा मोठा सहभाग
Saraf Sangh silver idol of Ambabai the temple kolhapur
Saraf Sangh silver idol of Ambabai the temple kolhapursakal

कोल्हापूर : कोल्हापूर सराफ असोसिएशनने १९९२ मध्ये बनवलेली ५१ किलो चांदीची अंबाबाईची मूर्ती आज देवस्थान समितीकडे सुपूर्द केली. वाद्यांच्या गजरात आणि देवीच्या जयघोषात मूर्तीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील देवस्थान समितीचे अध्यक्ष असताना सराफ असोसिएशनने अंबाबाईची देवीची मूर्ती देण्याचे ठरवले होते.

यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील यांनीही चांदी देऊन योगदान दिले होते. त्यानंतर काही कारणाने देवस्थान समितीने ही मूर्ती स्वीकारली नव्हती. या वर्षी या प्रश्नाचा तोडगा निघाला. देवस्थानने मूर्ती स्वीकारण्यास अनुमती दिली. त्यामुळे सराफ असोसिएशनने आज मूर्ती देवस्थानकडे सुपूर्द केली.असोसिएशनच्या कार्यालया शेजारी मंडप उभारला होता. तेथे सजवलेल्या ट्रॅक्टरवर मूर्ती ठेवून विधिवत पूजा केली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून नगरप्रदक्षिणेची सुरुवात झाली.

गुजरीतून भवानी मंडप, एमएलजी हायस्कूल, मिरजकर तिकटी मार्गे बिनखांबी गणेश मंदिर तेथून महाद्वार मार्गावरून मूर्ती अंबाबाई मंदिरात आणली. नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. धनगरी ढोल आणि देवीच्या गाण्यांवर भाविकांनी ताल धरत मूर्ती मंदिरात आणली. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांच्याकडे सुपुर्द केली. सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार, सुरेंद्र पुरवंत, संजय जैन, रवींद्र राठोड, संचालक शिवाजी पाटील, सुहास जाधव, ललित गांधी, महेंद्र ओसवाल, प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, प्रसाद कालेकर, किशोर परमार, ईश्वर परमार, राजेश राठोड, के. जी. ओसवाल, सुरेश गायकवाड, अमोल ढणाल, डॉ. श्वेता गायकवाड यांच्यासह लोक सहभागी झाले होते.

सराफ असोसिशनतर्फे दिलेली अंबाबाईची चांदीची मूर्ती देवस्थानच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. शासनाकडून अभिषेक आणि इतर विधींची नियमावली आल्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना कोठे आणि कधी करायची, याचा निर्णय घेऊ.

- शिवराज नायकवडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com