कोपर्डी बलात्कार प्रकरण: लक्ष आता निकालाकडे...

nagar-court
nagar-court

नगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या खटल्याचा आज (शनिवार) निकाल लागणार आहे. आधी या प्रकरणात आरोपी दोषी आहेत की नाही हे न्यायालय स्पष्ट करेल. आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यावर आजच अथवा एक दोन दिवसात आरोपीला न्यायालय शिक्षा सुनाविण्याचा अंदाज आहे. लोकांचे लक्ष असल्याने आणि आरोपींवर या आधी हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगरला जिल्हा न्यायालयासह कोपर्डी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

या खटल्याच्या पार्श्वभूमीवर आज निकालाची सुनावणी लवकरच सुरु होणार आहे. याआधी आज घडलेल्या घडामोडी  - 

  • कोपर्डी खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त. आरोपी न्यायालयात हजर.
  • न्यायालय परिसरात बाॅम्ब शोधक पथकाकडून तपासणी
  • लोकांची गर्दी होणार हे गृहीत धरून ध्वनीक्षेपकावरून निकालाची माहिती दिली जाणार आहे
  • विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात दाखल
  • जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात अकरा वाजता निकालाबाबत कामकाजाला सुरवात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com