मालमोटार लुटीच्या गुन्ह्यात सात जणांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

कोपरगाव - शेतकऱ्यांच्या संपाच्या पहिल्या दिवशी काल (गुरुवारी) मालमोटारी अडवून लूट केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सात जणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला.

पोलिसांनी सांगितले, की आरोपींकडून लोखंडी रॉड व दांडके जप्त केले आहेत. सीसीटीव्ही, व्हिडिओ चित्रणाच्या माध्यमातून उर्वरित आरोपींचा पोलिस तपास करीत आहेत.

दरम्यान, तालुक्‍यातील दहेगाव बोलका, मुंबई-नागपूर महामार्गावर, तसेच संवत्सर व पुणतांबे चौफुलीवर शेतकऱ्यांनी आजही दूध व कांदे रस्त्यावर फेकले. सरकारच्या विरोधात "बोंबाबोंब' आंदोलन करण्यात आले. तालुक्‍यातील सर्व व्यवहार, नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतूक आज सुरळीत झाली.

आंदोलनस्थळी काल नाटेगाव येथील शेतकरी अशोक शंकर मोरे यांचे निधन झाले. किसान क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे आज सांत्वन केले.