कोयना धरणातुन नदीपात्रात 2 फुटाने सोडले पाणी

in to koyana dam realease 2 feet water in river
in to koyana dam realease 2 feet water in river

कऱहाड - महाराष्ट्राची वरदायीनी ठरलेल्या पाटण तालुक्यातील कोयना धरणातुन आज मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास धरणाच्या सहा वक्र दरवाजातुन 2 फुटाने पाणी सोडण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणातुन 5 हजार 400 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. दरम्यान आज सकाळी आठ वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातुन 2 हजार 100 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीही मोठी वाढ झाली आहे.

पावसाचा जोर कायम असल्याने धरणातुन पाणी सोडण्याचा निर्णय़ कोयना धरण प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान प्रशासनाने कोयना-कृष्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com