अवैध दारुसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारुसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागाव -  राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोवा बनावटीच्या अवैध दारुसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील दोघा जणांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवार मध्यरात्री एक वाजता केली. 

या बाबतची माहिती अशी, चेतन विनायक साटेलकर  ( वय  २४ ) अजय सुर्यकांत कवठणकर ( वय , २० रा.  सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग ) हे दोघेजण मोटारीतून गणेशोत्सव निमित्त विक्रीसाठी गोवा बनावटीची दारुचे बाॅक्स घेवून जात होते. याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सांगली फाटा येथे हे पथक थांबले होते. त्यांनी ही मोटार येताच थांबवण्यासाठी प्रयत्न केला. पण  मोटार भरधाव वेगाने सांगलीच्या दिशेने निघून गेली. त्यांचा पाठलाग करत हेरले येथे पुन्हा प्रयत्न केला पण मोटार थांबली नाही. अखेर अतिग्रे गावाजवळ इचलकरंजी फाट्यावर अगोदरच थांबलेल्या पथकातील व्यक्तींनी मोटार पकडली. यामध्ये दोन लाख रुपयांचे गोवा बनावटीचे सुमारे पंचवीस बाॅक्स व साडेचार लाख रुपये किंमतीची मोटार असा सुमारे साडेसहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामधील अजय कवठणकर याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी, वाय. एम. पवार , गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी बरगे, सचिन काळेल, के.बी. नडे, संदिप जानकर, सागर शिंदे, जय शिनगारे, विशाल आळतेकर, आर एच. पिसे, वैभव मोरे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com