महावितरणला भविष्यातील अंधाराची चिंता; राज्यातील ग्राहकांकडे 40 हजार कोटींची थकबाकी 

Mahavitaran
Mahavitaran

सोलापूर : राज्यातील शेती, उद्योग क्षेत्रासह घरगुती वापरासाठी वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणला वाढत्या थकबाकीमुळे भविष्यातील अंधाराची चिंता सतावू लागली आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा बॅंकांनतर आता महावितरण थकबाकीमुळे अडचणीत सापडली आहे. 

राज्यात सुमारे 41 लाख कृषी ग्राहक असून त्यांना दोन कोटी 12 लाख एचपी विद्युत जोडभार असून त्यापैकी 25 लाख 41 हजार शेतकऱ्यांना मीटरद्वारे तर उर्वरित शेतकऱ्यांना अश्‍वशक्‍तीद्वारे वीजपुरवठा केला जातो. परंतु, सद्यःस्थितीत राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांकडे 24 हजार 699 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू केली; मात्र थकबाकी जैसे थे आहे. सध्या घरगुती ग्राहकांची 926 कोटी, व्यापारी ग्राहकांकडे 377 कोटी, उद्योग क्षेत्राकडे 700 कोटी, पॉवरलूमकडे 852 कोटी, स्ट्रीट लाइटची साडेतीन हजार कोटी, रेल्वेसह अन्य विभागांकडे आठ हजार कोटींची थकबाकी आहे. कर्जमाफीनंतर आता शेतकऱ्यांकडील विजेची थकबाकीही सरकारने माफ करावी, अशी मागणी पुढे येत असल्याने शेतकऱ्यांना त्याची आशा लागली आहे. परंतु, वसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही थकबाकी वसूल होत नसल्याने महावितरणची चिंता वाढली आहे. 

थकबाकी वसुलीसाठी विशेष योजना राबवूनही ग्राहकांकडील थकबाकी वसूल होत नाही. त्यामुळे आता संबंधित ग्राहकांच्या मालमत्तांवर महावितरणचा बोजा चढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. 
- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण 

विभागनिहाय थकबाकी 

विदर्भ 
5846.77 कोटी 
मराठवाडा 
12633.79 कोटी 
कोकण 
3428.65 कोटी 
पश्‍चिम महाराष्ट्र 
18447.08 कोटी 
एकूण थकबाकी 
40356.29 कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com