मोहोळ कृषी कार्यालयात अनेक असुविधा

राजकुमार शहा 
सोमवार, 23 एप्रिल 2018

मोहोळ - येथील तालुका कृषी कार्यालयाला अनेक समस्यानी घेरले आहे. विषेश म्हणजे तालुक्यातील 104 गावचा कारभार असणाऱ्या या कार्यालयात झेरॉक्स मिशन, बायोमेट्रिक यंत्रणा नाही. तसेच या कार्यालयात सलग आठ आठ तास विज नसते. त्यामुळे हे कार्यालय कोणासाठी अशी विचारणा शेतकरी करीत आहेत.

मोहोळ - येथील तालुका कृषी कार्यालयाला अनेक समस्यानी घेरले आहे. विषेश म्हणजे तालुक्यातील 104 गावचा कारभार असणाऱ्या या कार्यालयात झेरॉक्स मिशन, बायोमेट्रिक यंत्रणा नाही. तसेच या कार्यालयात सलग आठ आठ तास विज नसते. त्यामुळे हे कार्यालय कोणासाठी अशी विचारणा शेतकरी करीत आहेत.

मोहोळ शहरापासुन सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गालगत हे कार्यालय आहे. गेल्या दिड वर्षापासुन या ठिकाणी कायम स्वरूपी कृषी अधिकारी नाही. त्यामुळे महत्वाचे निर्णय होण्यासाठी अडचणीचे होत आहे. दोन किलोमीटर अंतर असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी जाणे अडचणीचे आहे. कुठल्याही वाहनाची सोय नाही, गेलेच तर त्या ठिकाणी आधिकारी मिळेल का? याची खात्री नसते. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. आधिकाऱ्याबाबत चौकशी केली तर उडवाउडवीची उत्तरे देवुन दुसरीकडे बोट दाखवतात. 

अद्यापही या ठिकाणी कर्मचाऱ्यासाठी बायोमेट्रीक यंत्रणा नाही. झेरॉक्स मशीन नाही. त्यामुळे एक रुपयाच्या झेरॉक्स साठी दोन किमी अंतरावर जावे लागते. कोण कर्मचारी कुठे गेला हे समजत नाही. 

गेल्या अनेक दिवसापासुन या ठिकाणी विद्युत पुरवठा नाही. हे कार्यालय ग्रामिण भागात मोडत असल्याने सलग आठ आठ तास विद्युत पुरवठा नसतो. नेट कॅफे चालक व कर्मचारी यांची मिलीभगत असल्याने वर्षाला 40 ते 50 हजाराची बिले द्यावी लागतात. अनेक कर्मचारी उशीरा येतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसून, 'आओ जाओ घर तुम्हारा' अशी अवस्था आहे. गेल्या वर्षभरापुर्वी कायम विद्युत पुरवठयासाठीचे महावितरणचे कोटेशन वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी साठी पाठवीले आहे. मात्र अद्याप ते लाल फितीत अडकले आहे. त्याला कृषी विभागाच्या पाठपुराव्यासाठी उदासीनता ही तेवढीच जबाबदार आहे. याकडे जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

विद्युत पुरवठ्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मोहोळ हे एकच अडचणीचे कार्यालय आहे. नाही तर शेवटचा  पर्याय म्हणुन हे कार्यालय गावात शिप्ट करावे लागेल.
शरद सोनवणे (प्रभारी तालुका कृषी अधिकारी मोहोळ)

Web Title: Many discomfort in Mohol Agriculture Office