#MarathaKrantiMorcha 'आम्ही समोरून लढतो, साप सोडत नाही'

#MarathaKrantiMorcha 'आम्ही समोरून लढतो, साप सोडत नाही'

सोलापूर : आम्ही समोरून लढतो, साप सोडत नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजावर आरोप करून अपमान केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावं अन्यथा माफी मागावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला होता. वारीला अडथळा निर्माण करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. वारीमध्ये काही संघटनांचा चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा डाव होता, असा दावाही त्यांनी या वेळी केला होता. वारीत दगडफेक घडवून आणण्याचा डावही आखण्यात आला होता. अशा प्रकारची हिंसक कामे करून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला होता. 

याविषयी बोलताना सोलापूर जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाने परिपत्रक काढत म्हटले आहे, की आम्ही आंदोलनात असलो तरी वारीत आमचे माय-बाप आहेत. आम्हाला कुणी परंपरा शिकवण्याची गरज नाही. सरकारने खोटे गुन्हे दाखल करण थांबवावे. क्रांती दिनी आम्ही महाराष्ट्र बंद बरोबरच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा सकल मराठा समाजाचा इरादा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com