'कर्जमाफीच्या अंमलबजावणीपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांना फी माफी द्यावी'

संदीप कदम
शनिवार, 24 जून 2017

राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब होत आहे. या पार्श्‍वभूमीवर फलटण तालुका नागरी विकास प्रतिष्ठानचे मुंबई अध्यक्ष अशोकराव सस्ते यांनी कर्जमाफीच्या अंमलबजावणीपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांना फी माफी द्यावी, अशी मागणी केली आहे.

फलटण (जि.सातारा) - राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब होत आहे. या पार्श्‍वभूमीवर फलटण तालुका नागरी विकास प्रतिष्ठानचे मुंबई अध्यक्ष अशोकराव सस्ते यांनी कर्जमाफीच्या अंमलबजावणीपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांना फी माफी द्यावी, अशी मागणी केली आहे.

सध्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे निकाल लागले आहेत. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र शिक्षणासाठी लागणारी फी भरण्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर सस्ते यांनी फी माफीची मागणी केली आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मुलामुलींची शैक्षणिक फी स्वीकारण्यास स्थगिती देऊन शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा-महाविद्यालयात प्रवेश द्यावेत. विद्यमान सरकारने निवडणुकीच्या काळात युवकांसाठी शैक्षणिक धोरण व नोकऱ्यांबाबत आश्वासन दिले होते. परंतु गेल्या तीन वर्षात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला असून त्याला जीवन नकोसे झाले आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षणासाठी हट्ट न करता मिळेल तेथे प्रवेश घेऊन आपल्या भवितव्यांचा विचार न करता शिकत आहेत. या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांना फी माफी शेतकऱ्यांच्या मुलांना या शेतकर्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे.'