बेळगाव: आवक घटल्याने बटाटा दरात वाढ

Potato
Potato

बेळगाव : आवक घटल्यामुळे इंदूर व आग्रा बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे. गतआठवड्यात इंदूर बटाट्याचा 500 ते 800 रुपये असणारा दर शनिवारी (ता. 15) 800 ते 900 रुपये झाला. तर आग्रा बटाट्याच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाली असून 700 ते 800 रुपये भाव झाला आहे. मागील आठवड्यात टोमॅटोचे दर भडकले होते. या आठवड्यात मात्र टोमॅटो स्थिर असून प्रति दहा किलोला 500 रुपये दर होता. भाज्यांच्या दरातही किरकोळ घसरण झाली असून मागील आठवड्याच्या तुलनेत दर स्थिर आहेत. 

कडधान्यामध्ये हरभरा डाळीचा दर उतरला असून गत आठवड्यात 84 रुपये प्रति किलो असलेला दर शनिवारी 80 रुपये होता. उडीद डाळीचे दरही उतरले असून 80 रुपये दर झाला आहे. गत आठवड्यात उडीदचा दर 110 रुपये प्रति किलो होता. चवळी व हरभऱ्याचा दर वाढला असून अनुक्रमे दर 70 व 74 रुपये प्रति किलो झाला आहे. चिकनच्या दरात 30 रुपयांनी घट झाली असून 170 रुपये झाला आहे. 

कृषी उत्पादन*दर (प्रति क्विंटल रुपयांत) 
इंदूर बटाटा* 800 ते 900 
आग्रा*700 ते 800 
पांढरा कांदा*800 
लाल कांदा*400 ते 800 

धान्य बाजारपेठ (प्रती किलो) 
बार्शी ज्वारी* 40 
विजापूर ज्वारी*36 
गहू क्रमांक *30 
साधा तांदूळ*30 
सोना मसुरी *46 
बेळगाव बासमती*80 
दिल्ली बासमती * 80 ते 110 
तूरडाळ क्र.1*70 
तूरडाळ क्र.2*67 
हरभरा डाळ*80 
मूगडाळ*70 
मसूर डाळ*70 
उडीद डाळ *100 
हरभरा*74 
नाशिक मसूर*60 
जवारी मसूर*140 
मूग*70 
मटकी*60 
उडीद* 80 
चवळी*70 

खाद्यतेल दर (प्रति किलो) 
रिफाईन्ड सनफ्लॉवर*84 
सोयाबीन*76 
मोहरी तेल*150 
वनस्पती*80 
खोबरेल*200 
पामतेल एक पाकीट*65 

किराणा दर (प्रती किलो) 
साखर*40 
साधा चहा*240 
दार्जिलिंग चहा*280 
बारीक रवा*32 
केसरी रवा*42 
रवा*40 
इडली रवा*30 
ैमैदा*30 
आटा*28 
बेसन*90 
मध्यम पोहे*40 
डीलक्‍स पोहे*44 
साबुदाणा*80 
वाटी खोबरे*120 
बाबुरी खोबरे*120 
धने*140 
हळकुंड*160 
हळदपूड*160 
मोहरी*120 

भाजीपाला दर (प्रति 10 किलो) 
टोमॅटो*500 
वांगी*200 
सिमला मिरची*300 ते 400 
जवारी मिरची*250 ते 300 
बटका मिरची*400 
गवार*150 ते 200 
भेंडी*200 ते 250 
बीन्स*200 ते 250 
दोडके*220 ते 250 
कारले*300 
काकडी*80 ते 100 
बीट 200 ते 250 
इंग्लिश गाजर*250 ते 400 
कोबी*30 ते 40 
आले*400 ते 500 
नवलकोल*100 ते 150 
गोल भोपळा (क्विंटल) *800 ते 1000 
दुधी भोपळा डझन *80 ते 100 
फ्लॉवर दीड डझन*450 ते 500 

पालेभाज्या दर (प्रती शंभर नग) 
कोथिंबीर*300 ते 600 
पुदिना*300 ते 400 
पालक*200 ते 250 
मेथी*300 
लाल भाजी*300 
शेपू*400 
कांदा पात*300 ते 350 
मुळा भारा 50 नग* 80 ते 100 

फळे (प्रति किलो) 
सफरचंद*80 ते 120 
पेरू*20 ते 40 
डाळींब*70 ते 100 
पपई*20 ते 40 
केळी*30 ते 40 
अननस*30 ते 50 

मांस दर (प्रति किलो) 
सुरमई*400 ते 1300 
झिंगा*450 ते 500 
बांगडा*200 
पांढरा पापलेट*350 ते 900 
काळा पापलेट*400 ते 500 
नगली*400 ते 500 
तारली*160 
सौंदाळे*200 
मटण*420 
चिकण*170

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com