वन्य प्राण्यांकडून नुकसानीचा विमा योजनेत सहभाग करावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, आजरा, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्‍यांतील शेतपिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या शेती क्षेत्रातील पीक नुकसानीचा विमा योजनेत सहभाग करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने वन्य प्राण्यांकडून नुकसान होणाऱ्या पिकांचा विमा योजनेत समावेश करण्याबाबत कोणती कार्यवाही केली? नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत? या संदर्भात आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्‍न उपस्थित केला. 

या प्रश्नाला लेखी उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ''राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, आजरा, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्‍यांत वन्य प्राण्यांनी शेतपिकांचे नुकसान केल्याप्रकरणी प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींच्या अधीन राहून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यास नुकसानभरपाई आदा केली.

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पीक नुकसानीस प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण देण्यात येत नाही. वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पीक नुकसानीबाबतच्या जोखमीस विमा संरक्षण देण्याची बाब धोरणात्मक असून, या संदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांत केंद्र शासनाकडून बदल होणे आवश्‍यक आहे.'' 

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - टेंबलाईवाडी प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची दारे मोडल्यामुळे महिला चौकटीला साडीचा आडोसा करुन शौचास बसतात. नगरसेवक...

08.27 PM

कऱ्हाड (सातारा): कोयना धरणा पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात सरासरी...

07.42 PM

सातारा : साताऱ्याच्या निसर्गसंपन्नता व सृष्टी सौंदर्याबद्दल मी खूप ऐकले होते. कास पठार व डोंगरदऱ्या पाहिल्यानंतर आपल्याकडे ही...

07.24 PM