कारगिलमध्ये कर्तव्य बजावताना आजऱ्याच्या जवानाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

उत्तूर : लडाख-कारगिल मार्गावर दारुगोळा घेऊन जाणाऱ्या लष्करी गाडीचा अपघात होऊन आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील लान्स नायक गणर प्रवीण येलकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने आजरा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

त्यांचे मूळ गाव बेगवडे (ता. भुदरगड) आहे. उद्या (शुक्रवार दि. 13) बहिरेवाडी येथील भैरवनाथ हायस्कूलच्या पटांगणावर दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

लष्करी अधिकाऱ्यांनी आजरा तहसीलदारांना दिलेल्या माहितीनुसार, लडाखहून लष्करी गाडीतून कारगिल सीमेकडे दारुगोळा वाहून नेला जात होता. यावेळी टायर फुटल्याने गाडी उलटली. दारूगोळ्याचे बॉक्स येलकर यांच्या अंगावर पडले आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला.

त्यांचे पार्थिव उद्या बहिरेवाडी येथे आणले जाणार असून लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. येलकर यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व सात वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

Web Title: marathi news marathi websites Kargil Ladakh Indian Army Pravin Yelkar