पहिली उचल एकरकमी 3400 रुपये द्या : शेट्टी

राजकुमार चौगुले
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ऊस गाळप होणाऱ्या उसास पहिली उचल विनाकपात 3400 रुपये द्यावी; अन्यथा यंदाचा हंगाम सुरू करू न देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी जयसिंगपूर येथे दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 16 व्या ऊस परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अजित बाबा शिंदे होते 

शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या ऊसविषयक भूमिकेवर टीका केली. शेट्टी म्हणाले, 'गेल्या हंगामातील एफआरपी अनेक कारखान्यांनी दिली नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत; अन्यथा अशा कारखान्यांविरोधात तीव्र आंदोलन करू. केंद्र व राज्य सरकारने ऊस उत्पादकांच्या बाबतीत प्रतिकूल निर्णय घेतले, याचा फटका ऊस उत्पादकांना बसत आहे.

एकीकडे ऊस उत्पादक विविध समस्यांनी ग्रस्त असतानाच भागविकास निधी व अन्य निधीतून उत्पादकांच्या खिशातून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. राज्याबाहेर ऊस घालण्यास बंदी म्हणजे आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. असे निर्णय मागे न घेतल्यास सरकारला तीव्र असंतोषास सामोरे जावे लागेल.' या वेळी शेट्टी यांनी गेल्या हंगामातील साखर उद्योग, केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे या उद्योगात होत असलेली प्रतिकूलतेची स्थिती याविषयी सविस्तर भाष्य केले.

ऊस तोडणी महामंडळास शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, या महामंडळामार्फतच तोडणी मजुरांचा पुरवठा व्हावा, अशा मागण्या शेट्टी यांनी केल्या. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर आक्रमक टीका केली. परिषदेला संघटनेच्या राज्यभरातील प्रतिनिधींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

सदाभाऊंवर टीका 
संघटनेतून हकालपट्टी झालेल्या मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सर्वच वक्‍त्यांनी तीव्र टीका केली. ऊसदर जाहीर करायला हा काय खत्रीचा मटक्‍याचा आकडा आहे का? या वाक्‍यावरून परिषदेत मोठा संताप व्यक्त करण्यात आला.