कोपरगाव: गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

अरुण गव्हाणे
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पोहेगाव (जि. नगर) : कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे महेंद्र शिवाजी देशमुख या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

शिर्डी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील महेंद्र शिवजी देशमुख (वय 33) वर्षे यांनी शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील कडुलिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळी शेजारील नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलीस पाटील राजेंद्र शेटे यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल वर्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहाता येथे पाठवण्यात आला. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील,  मुलगीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल औटी, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल वर्पे हे करीत आहेत. दुपारी दीड वाजता महेंद्र यांच्यावर रांजणगाव देशमुख येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.