विरोधक एकत्रित आल्याने सत्ताधारी भाजपवर नामुष्की

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

सोलापूर : झोन समितीच्या प्रस्तावावर सर्व विरोधी पक्ष एकत्रित आल्याने सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर आली.

महापालिकेत एकूण १०२ सदस्य आहेत. भाजप ४९ आणि सर्व विरोधी पक्ष मिळुन ५३ असे बलाबल आहे. आठपैकी पाच समित्यांवर भाजपची सत्ता येइल अशा रचनेचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी सभेकडे पाठविला होता. मात्र विरोधकांकडे पाच आणि भाजपला फक्त तीन समित्या मिळतील अशी उपसूचना विरोधकांनी तयार केली.

त्यामुळे उपसुचनाच मंजुर होणार हे स्पष्ट झाल्याने तसेच पक्षांतर्गत दगाफटका होण्याची चिन्ह दिसू लागल्याने सभा तहकूब करण्यात आली. निमित्त मात्र दुखवट्याच्या प्रस्तावाचे सांगण्यात आले.