संबळाच्या निनादात तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

तुळजापूर : आई राजा उदो- उदोच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दसऱ्याच्या उषःकाली तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन शनिवारी (ता. ३०) पहाटे सहाच्या सुमारास संबळाच्या निनादात पार पडले.

राज्याची कुलस्वामिनी आणि पहिले शक्तीपीठ असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात बुऱ्हानगर येथील पालखी, पलंग, मायमोरताबाचे आगमन शुक्रवारी (ता. २९) मध्यरात्री झाले. मध्यरात्रीनंतर पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे शुक्रवारपेठ, आर्यचौकमार्गे तुळजाभवानी मंदिरात पालखीचे आगमन झाले. बुऱ्हानगर येथून आलेल्या पालखीत तुळजाभवानी मातेचे सीमोल्लघंन शनिवारी पहाटे सहा वाजता सुरू झाले.

तुळजाभवानी मातेस साखर, भाताचा नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्यांनी ओवाळण्यात आले. तुळजाभवानीची मूर्ती पलंगावर निद्रिस्त झाली. तुलजाभवानी मातेचे भोपे, पलंग, पालखी, मायमोरताबचे मानकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी 
तुळजाभवानी मंदिर समितीतर्फे पालखीचे मानकरी विजय भगत, पलंगाचे मानकरी गणेश पलंगे, मायमोरताबचे मानकरी अंबादास क्षीरसागर, मशालचे मानकरी राम सुतार यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भरपेहराव आहेर केला. यावेळी भोपे मंडळाच्या सदस्या फेटे घालून उपस्थित होत्या.

भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर कदम, महंत चिलोजीबुवा, महंत तुकोजीबुवा, सचिन पाटील यांच्यासह गोंधळी, आराधीनी महिला उपस्थित होत्या. यावेळी आई राजा उदो उदोच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेले होते. यावेळी भाविकांनी कुंकू व फुलांची पालखीवर उधळण केली.

टॅग्स