सांगली, कोल्हापूरला भूकंपाचा सौम्य धक्का 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

सुमारे वीस सेकंदाहून अधिक आळ धक्का जाणवत होता. वीस सेकंद धक्का जाणवल्याने लोक घाबरून घराबाहेर आले. दारे, खिडक्यांची तावदाणे यांचा जोरात आवाज झाला, पत्रे असलेल्या छतातून मोठा आवाज होत होता

पुणे - कोल्हापूर आणि सांगली परिसरात शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्‍टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपामुळे लोक घाबरून घराबाहेर आले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोयना बॅकवॉटरमध्ये 4.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू पुण्यापासून 144 किमीवर तर पाण्याखाली 10 किमी खोल होता. सातारा, सांगली, कोल्हापुरात भूकंपाचा धक्का जाणवला. पाटण तालुका भुकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. रात्री पावणेबाराच्या सुमारास हा धक्का बसला. धक्क्याची तीव्रता व नुकसानीची माहिती अद्याप मिळत नाही. 

सुमारे वीस सेकंदाहून अधिक आळ धक्का जाणवत होता. वीस सेकंद धक्का जाणवल्याने लोक घाबरून घराबाहेर आले. दारे, खिडक्यांची तावदाणे यांचा जोरात आवाज झाला, पत्रे असलेल्या छतातून मोठा आवाज होत होता त्यामुळे लोक घाबरून घराबाहेर आले. गोव्यातही धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.