संगमनेरमध्ये विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

dead_body
dead_body

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश म्हतू जोंधळे (वय २३) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, बुधवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास गणेश जोंधळे हा शेतातील पिकास पाणी भरण्यासाठी गेला होता. दरम्यान पाय घसरून तो सत्तर फुट खोल विहिरीत पडला. त्यास पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. विहिरीजवळ त्याच्या चपला पडलेल्या होत्या.

गुरुवारी सकाळी संजय कोंडाजी मोरे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. सहायक फौजदार बाळासाहेब घोडे व पो. हवालदार अण्णासाहेब दातीर यांनी सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, राजू भडांगे, सतीश पवार व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर रीतसर पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह संगमनेर कुटीर रुग्णालयात हलविला. बाळासाहेब म्हतू जोंधळे यांनी खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बाळासाहेब घोडे व पो. हवालदार अण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहे. मयत गणेश जोंधळे यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने कौठेकमळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com