सातारा-तारळेत शिवजयंती उत्साहात साजरी

Satara
Satara

तारळे (सातारा) : येथील ऐतिहासिक राजेमहाडीक घराण्यातर्फे 1931 साला पासून साजरी करण्यात येत असलेली शिवजयंती याही वर्षी परंपरेने साजरी करण्यात आली. प्रतिवर्षा प्रमाणे तारळे प्राथमिक शाळेची मुले व मुली भानजी राजेमहाडीक यांच्या वाड्या समोर आल्यावर शिवप्रतिमा सजविलेल्या पालखीत ठेऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात आले. तदनंतर ऐतिहासिक पद्धतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली.

ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीचे छोटेखानी सभेत रूपांतर झाले. येथे विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सरपंच सुनिता खांडके अध्यक्ष स्थानी होत्या. यावेळी श्रीमंत शिलासिंग राजेमहाडीक, माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ देशमुख, अशोक जगधनी, विश्वास खांडके, मुखायधपक गणेश मायने, राजेमहाडीक परिवार उपस्थित होता. येथील राजेमहाडीक घराण्यात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कन्या अंबिकाबाईराजे व श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या कन्या भवानीबाईराजे दिल्या होत्या. यातील भवानीबाईराजे या पती बरोबर सतीही गेल्या होत्या त्यांची समाधी आजही येथे पाहवयास मिळते. त्यामुळे ऐतिहासिक असलेल्या राजेमहाडीक घराण्याच्या शिवजयंती उत्सवाला विशेष महत्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com