माढ्यातील निवडणुकीसंबंधी उदयनराजेंची तुपकरांशी गुप्तगू 

माढ्यातील निवडणुकीसंबंधी उदयनराजेंची तुपकरांशी गुप्तगू 

सातारा - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस दणक्‍यात साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांच्या राजकीय गुप्तगू झाले. माढा लोकसभा निवडणूक लढताना मदतीचा हात देण्याचे आश्‍वासन उदयनराजेंनी त्यांना दिले. 

सिंद्धखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीला खासदार उदयनराजे उपस्थित होते. त्या वेळी रविकांत तुपकर यांचे तेथे भाषण झाले. ते ऐकून उदयनराजे प्रभावित झाले होते. त्या वेळी त्यांनी तुपकरांना साताऱ्यात आल्यावर निवासस्थानी येण्याचे निमंत्रण दिले होते. गेले दोन दिवस श्री. तुपकर सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी उदयनराजे यांची त्यांच्या "जलमंदिर' या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी त्यांनी उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सत्कारही केला. या वेळी दोन्ही नेत्यांनी सुमारे तासभर राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण आणि पक्ष, संघटनांविषयी चर्चा झाली. 

आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना माढा मतदारसंघातून उमेदवार उभा करणार आहे. त्यासाठी माझी तयारी सुरू असल्याचे तुपकरांनी सांगितले. माढ्यात लढताय चांगली तयारी करा. मागील वेळी थोड्यात चुकलाय; पण यावेळेस तुम्हाला बेस्ट ऑफ लक. मदत लागली तर सांगा. तुम्हाला लागेल ती मदत केली जाईल, असे आश्‍वासन उदयनराजेंनी त्यांना दिले. राजू शेट्टींचे काम खूप चांगले आहे. शेतकरी प्रश्‍नावर तुम्ही खूप चांगली लढाई लढताय. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मीही तुमच्या सोबत आहे, असेही त्यांनी नमूद केले. खासदार शेट्टी करत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरील कामाचे उदयनराजेंनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com