कोट्यवधींचा भूखंड रुपयात खरेदी! 

कोट्यवधींचा भूखंड रुपयात खरेदी! 

सातारा - जिल्हा परिषदेसमोरील कोट्यवधी रुपये बाजारमूल्य असलेला एक एकराचा भूखंड केवळ एक रुपयात सातारा पालिकेने खरेदी केला. या भूखंडावर लवकरच पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. अण्णासाहेब कल्याणी यांच्या स्मरणार्थ ही वास्तू ओळखली जाणार आहे. 

जिल्हा परिषदेसमोर सुमारे ५० गुंठे क्षेत्र असलेल्या एका खासगी भूखंडावर पालिकेचे ‘टाउन हॉल’चे आरक्षण आहे. या जागेवर शासनमान्यता घेऊन पालिका नवीन प्रशासकीय इमारत बांधणार आहे. येत्या शनिवारी (ता.२४) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजित इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. पालिकेची सध्याची प्रशासकीय इमारत अपुरी व गैरसोईची आहे. पूर्वेकडे शहराचा विस्तार वाढत असल्याने मध्यवर्ती ठिकाण म्हणून या जागेची निवड करण्यात आली आहे. 

रुपयात एकर खरेदी
नव्या इमारतीसाठी पालिका पदाधिकारी जागेच्या शोधात होते. या गरजेतून जिल्हा परिषदेसमोरील कल्याणी इस्टेटमधील जागेचा प्रस्ताव पुढे आला. कोरेगाव रस्त्यावर असलेल्या  या दर्शनी भूखंडाचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपये असल्यामुळे पालिकेला आर्थिकदृष्ट्या तो खरेदी करणे न परवडणारे आहे. त्यातून सर्वमान्य तोडगा पुढे आला आणि लोकहित लक्षात घेऊन केवळ एक रुपयात सुमारे एक एकर जागेचे खरेदीखत शनिवारी नोंदवले गेले.

खासदारांचा पुढाकार
खासदार उदयनराजे भोसले यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा गतीने कामाला लागली आणि अवघ्या काही महिन्यांत शहराच्या सर्वांत उच्चभ्रू गणल्या जाणाऱ्या सदरबझार भागातील सुमारे एक एकर जागा केवळ एक रुपयात पालिकेच्या नावावर झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com