बाळासाहेबांच्या स्मारकाला मिळेना ठेकेदार

Solapur Muninipal corporation
Solapur Muninipal corporation

सोलापूर : अतिशय गाजावाजा करीत भूमिपूजन झालेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारणीला ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महापालिकेने या कामाची निविदा भरण्यासाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या या स्मारकाच्या कामाला जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी पुढाकार घेतल्याने चालना मिळाली. महापालिकेने पाच कोटी रुपयांच्या कामांची निविदाही काढली. मात्र, एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे महापालिकेने निविदा भरण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे. 

17 नोव्हेंबर 2012ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यानंतर 20 नोव्हेंबर 2012ला सोलापूर महापालिकेने स्मारक बांधण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. विजयपूर रस्त्यालगत रेवणसिद्धेश्‍वर मंदिरजवळ सोलापूर महापालिकेच्या जागेची पाहणी स्मारकासाठी करण्यात आली. नंतर या जागेऐवजी पोलिस मुख्यालयासमोरील मार्कंडेय जलतरण तलावाजवळची जागा या स्मारकासाठी निश्‍चित करण्यात आली. त्याचे 17 नोव्हेंबर 2017ला पालकमंत्री विजय देशमुख यांच्या उपस्थितीत भूमिपूजनही झाले. मात्र, निविदा दाखल न झाल्याने स्मारकाचे काम पुन्हा लांबणीवर पडणार आहे. 

शिवसेना भवनाच्या धर्तीवर असेल स्मारक 
मुंबई येथील शिवसेना भवनच्या धर्तीवर सोलापुरातील हे स्मारक असणार आहे. यात वाचनालय, अभ्यासिका, ग्रंथालय, ऍम्फी थिएटर, कलादालन असेल. दोन हजार 700 चौ. मी. जागेत हे स्मारक बांधण्याचा प्रस्ताव आहे. स्मारकासाठी 2017-18 च्या अंदाजपत्रकात भांडवली कामांतर्गत दोन कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com