राज ठाकरेंना साहित्यातला मर्म माहित नाही: देशमुख

Raj Thackeray
Raj Thackeray

सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्यिकांवर केलेली टीका साहित्यातील मर्म माहीत नसल्यामुळेच केल्याच प्रत्युत्तर  साहित्यिक आणि 91 व्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिले आहे. 

सोलापूरात शर्मिला पत्रकार संघात वार्तालाप कार्यक्रमात बोलताना देशमुख यांनी राज ठाकरे राजकारणासाठी ही भूमिका मांडत असल्याचा आरोप केला. राज्यात अनेक महत्वाचे विषय आहेत. मराठी माणसापासून मुंबई तोडण्याचा डाव टाकला जातोय. मात्र त्यानंतरही साहित्यिक आणि विचारवंत गप्प आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली होती. बडोदा इथे होणाऱ्या 91 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्ष आहेत.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, की राज ठाकरेंना साहित्यातला मर्म माहीत नाही. साहित्यिक आपल्या भूमिका साहित्यातून मांडतात. त्यामुळे राज ठाकरेंची साहित्यिकांविषयीची भूमिका चुकीची आहे. साहित्यिक तात्कालिक आणि तात्काळ नव्हे आपल्या तर साहित्यातून भूमिका मांडतात. नेत्यांची तात्काळ भूमिका राजकारण आणि निवडणूकीसाठी असते. राज्य सरकारने मराठी शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या निर्णयामुळे मराठीला घरघर लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com