करमाळा: अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार

crime
crime

जामखेड : घरात कोणी नसल्याची संधी साधून अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून जामखेड पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दत्ता काळे (रा. आरोळे वस्ती, जामखेड) असे त्याचे नाव आहे.

चिखलठाण (ता. करमाळा) येथे बुधवारी (ता. 13) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार झाला. याबाबत आरोपीच्या पत्नीनेच जामखेड पोलिस ठाण्यात काल (शुक्रवारी) रात्री फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून तो करमाळा पोलिसांकडे वर्ग केला.

आरोळे वस्तीवरील दत्ता काळे याचे कुटुंब ऊस तोडणीसाठी चिखलठाण (ता. करमाळा) येथे गेले होते. त्यांना एक लहान मुलगी (वय समजू शकले नाही) आहे. तिला सांभाळण्यासाठी दत्ता काळे याने नऊ वर्षांच्या मेव्हणीला सोबत नेले होते. दरम्यान, मुलगी आजारी पडल्याने बुधवारी (ता. 13) काळे याच्या पत्नीने उपचारासाठी तिला जामखेडला आणले. पती व छोट्या बहिणीस चिखलठाणलाच ठेवले.

जामखेडमध्ये मुलीवर उपचारास उशीर झाल्याने ती त्या दिवशी चिखलठाणला जाऊ शकली नाही. पत्नी परत न आल्याने घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी दत्ता याने अल्पवयीन मेव्हणीवर रात्री दहाच्या सुमारास बलात्कार केला. मुलीला घेऊन आरोपी दत्ताची पत्नी दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) चिखलठाणला परतली. त्यावेळी तिच्या बहिणीने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर काल (शुक्रवारी) पीडित बहिणीला घेऊन आरोपीची पत्नी जामखेडला आली. जामखेड ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. नंतर जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दत्ता काळे याच्याविरुद्ध काल रात्री शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल केला. पुढील कार्यवाहीसाठी तो करमाळा पोलिसांकडे वर्ग केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com