खासदारकीसाठी शिवसेना संपर्कप्रमुखांचे शिंदेंना साकडे

Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde

सोलापूर : "साहेब, सोलापुरातून खासदारकीला तुम्हीच उभारा'' असे साकडे कॉंग्रेसच्या नव्हे तर शिवसेनेच्या संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आज घातले. 

लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत शिंदे यांनी महिन्यापूर्वी दिले होते. त्यावर, "शिंदे हेच माझे प्रतिस्पर्धी असतील' असा दावा खासदार ऍड. शरद बनसोडे यांनी केला होता. याबाबत सोलापुरात क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच श्री. बरडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मंगळवारी सकाळी श्री. शिंदे यांचे "जनवात्सल्य' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, माऊली पवार उपस्थित होते. 

"साहेब शिवसेनेचे, मी साहेबाचा..' अशी सुरवात करीत श्री. बरडे यांनी "साहेब तुम्हीच लोकसभेसाठी उभारा. आमच्यासाठी तुम्हीच "युवा' उमेदवार आहात.'' असे बोलताना, ""मी साहेबांना दोन-तीन महिन्याला भेटायला येत असतो हं..' असे सांगायला श्री बरडे विसरले नाहीत. त्यावर श्री. शिंदे यांनी "यांच्या पक्षाचे मुख्य नेत्यांबरोबर आमची बैठक असते, तर यांच्याशी भेटायला काय अडचण आहे'', असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. त्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत श्री. शिंदे व श्री. बरडे यांच्यात गुप्तगु झाली. 

नाराजीमुळे बरडेंची भूमिका 
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी महेश कोठे यांची नियुक्ती केल्यापासून श्री. बरडे नाराज आहेत. त्यातच श्री. कोठे यांनी ऐनवेळी उमेदवारी कापल्याने एक महिला आघाडीच्या प्रमुखही नाराज आहेत. या दोन्ही नाराजांनी श्री. शिंदे यांच्याशी संपर्क वाढवला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सोलापुरातील राजकारणाची गणितं बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com