व्हायब्रंट एच. आरच्या गिर्यारोहकांनी केले कळसुबाई सर

Trekking
Trekking

टाकवे बुद्रुक : व्हायब्रंट एच. आरच्या साहसी गिर्यारोहकांनी महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर सर केले. व्हायब्रंट एच. आर. ही मानवी संसाधन विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची संघटना असून ती आपल्या सभासदांसाठी नेहमीच आगळे वेगळे व साहसी उपक्रम राबवत असते. याचे कारण हेच असते की, मानवी संसाधन विभागात काम करण्याऱ्या सभासदांना साहसी गोष्टी करण्यास प्रवृत्त करणे त्यातूनच ही मोहीम फत्ते झाली. गिर्यारोहणाचा निश्चय करून महाराष्ट्रातील सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या कळसुबाई या शिखराची निवड झाली, सर्वच सभासदांमध्ये मोठा उत्साह होता, परंतु  कठीण परिस्थितीचा विचार करीत ठराविक सभासदांना संधी देण्यात आली. नियमित गिर्यारोहण करणारे सुधीर पाटील, मिलिंद पोरे, शीतल साळुंके, अनिल उबाळे, संतोष पवार, रोहिणी शेडगे आणि शंकर साळुंखे यांचा समावेश होता. मोहीम दिनांक ९ डिसेंबरला सकाळी पहाटे ४.३० वाजता चानू झाली. 

तीन तास खडतर ट्रेकिंग करून टीमने ५४०० फुटाचे कळसुबाई शिखर गाठले. ट्रेकिंग करताना घोंगावणारा थंड वारा, निसरडी पण दमछाक करायला लावणारी वाट, चढउतार खोल दरी आणि अवघड व चक्कर आणून सोडणारे लोखंडी जिने चढताना मोठी कसरत करावी लागली. अनेक अडचणींवर मत करीत, एकामेकांच्या मदतीने टीम शिखरावर पोहचली. इतक्या वर पोहचून टीमने आनंद व्यक्त केला. त्यानंतर कळसुबाई देवीचे दर्शन घेतले. एकीकडे आनंदाला पारावार नव्हता पण दुसरीकडे मन अस्वस्थ होते. ते तेथे पडलेले प्लास्टिकचे कागद, पिशव्या, पाण्याच्या बाटल्यांचा खच पाहून, हा कचरा उचलून स्वच्छतेचा धडा आपल्यापासून गिरवायला टीमने सुरूवात केली. स्वच्छता मोहीम राबवून कळसुबाई शिखर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प टीमने केला. आगामी काळात कळसुबाई स्वछता व जागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती सुधीर पाटील यांनी दिली. केवळ याच शिखरावर हे आभियान असे नाही तर येत्या २३ व २४ डिसेंबर रोजी सालाबाद प्रमाणे रायगड स्वछता अभियान राबवण्यात येणार आहे. ही मोहीम सुधीर पाटील आणि शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यशस्वी पणे पार पाडण्यासाठी अनिल उबाळे, शीतल साळुंके यांचे सहकार्य लाभले येथील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com