हुतात्मा राजेंद्र तुपारे अनंतात विलीन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेले जवान राजेंद्र तुपेरे यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) चंदगड येथील त्यांच्या कार्वे या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज सकाळी तुपारे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले गेले. त्यांचे पार्थिव गावातील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी संपूर्ण कार्वे गाव मैदानात दाखल झाले होते. सकाळी नऊ वर्षांचा मुलगा आर्यनने त्यांना अग्नि दिला. 'अमर रहे, अमर रहे, राजेंद्र तुपारे अमर रहे' अशा घोषणा देत उपस्थितांनी तुपारे यांना निरोप दिला. राज्य सरकारने तुपारे यांच्या कुटुंबियांनी 15 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सोमवारी रात्री त्यांचे पार्थिव बेळगावात आणण्यात आले होते. बेळगावला त्यांना मानवंदना देण्यात आली.

दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत व्हावी, यासाठी पाकिस्तानच्या सैन्याने शस्त्रसंधीचा भंग करीत पूँच जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी केलेल्या जोरदार गोळीबारात भारतीय लष्कराचे राजेंद्र तुपारे यांच्यासह दोन जवान हुतात्मा झाले, तर दोन जवान, दोन स्थानिक महिला आणि सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी असे पाच जण जखमी झाले.

Web Title: Martyr Rajendra Tupere cremation