म्हेत्रे कुटुंबीयांकडुन सात हजार पुस्तके दान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

तासगाव - ज्येष्ठ द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांच्या आई रुक्‍मिणी बाबूराव म्हेत्रे आणि शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरी आर. डी. (भाऊ) म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून 22 शाळांना तब्बल सात हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले. हा अभिनव उपक्रम म्हेत्रे कुटुंबीयांनी राबवला. शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक प्रमाणे संस्कारक्षम पुस्तके देण्यात आली. या उपक्रमाबद्दल म्हेत्रे कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. 

द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे, अनिल म्हेत्रे आणि कुटुंबीय सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांच्या आई रुक्‍मिणी म्हेत्रे, चुलत बंधू संशोधक व प्रयोगशील शेतकरी आर. डी. भाऊंचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यांचा पहिला स्मृतिदिन आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाने करण्याचे कुटुंबाने ठरविले. तासगाव शहरातील 22 शाळांतील विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शालेय पुस्तकांव्यतिरिक्‍त बाल वाङ्‌मय, विज्ञान, आरोग्य, योग संस्कार अशी पुस्तके भेट देण्यात आली. शहरात प्राथमिक, माध्यमिक शाळांत 6 हजार 500 विद्यार्थी शिकतात. प्रत्येक विद्यार्थ्यांला एक प्रमाणे शिक्षकांच्या ताब्यात ही पुस्तके देण्यात आली. 

ज्या ग्रंथालयात आर. डी. भाऊ संचालक होते. त्या ऍड. आमदार आर. आर. पाटील ग्रंथालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला राज्यसेवा व अन्य स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्‍त नव्या अभ्यासक्रमांची 350 पुस्तके देणगी देण्यात आली. पुस्तकांची निवडही चोखंदळपणे करण्यात आली होती. कथा कादंबऱ्यांपेक्षा चित्रमय, गोष्टीरूप, संस्कारक्षम अशी पुस्तके जी मुले आवर्जून वाचतील, अशा पद्धतीने निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार संदर्भग्रंथांचाही समावेश करण्यात आला. 

शिक्षण आणि वाचन मुलांना सुशिक्षित बनविते म्हणून पुस्तके देण्याचा उपक्रम राबवला, प्रत्येकजण समाजाचे देणे लागतो त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न केल्याची भावना म्हेत्रे कुटुंबीयांनी व्यक्‍त केली.  

"हा उपक्रम समाजात दातृत्वाची भावना कायम असल्याचे प्रतीक आहे. सुहृदयाच्या आठवणी जपताना पुस्तकवाटपासारखा उपक्रम राबवून म्हेत्रे कुटुंबीयांनी वेगळे उदाहरण समाजासमोर ठेवले.'' 
उल्हास मिरजकर, शिक्षक 

Web Title: Mhatre family members donate seven thousand books