शेतकरी वाटणार 3 मेपासून मोफत दूध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नगर - दुधाला किमान 27 रुपये दर देण्याच्या दिलेल्या आश्‍वासनाचा सरकारला विसर पडला आहे. सध्या दुधाला केवळ सोळा ते अठरा रुपये दर मिळत आहे. त्यामुळे मातीमोल दराने दूध विकण्यापेक्षा "फुकट दिलेलं बरं' अशी भावना ठेवून 3 मे रोजी दूध मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी लाखगंगा (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथे शनिवारी (ता. 21) ग्रामसभा होत असून, चार गावांतील शेतकरी त्यात सहभागी होणार आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांनाही मोफत दूध देण्याचे आवाहन केले जाणार आहे.
Web Title: milk distribution free by farmer