#MilkAgitation शेट्टींचा दूध मागणी दर म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक - माने

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जुलै 2018

दुधाचा उत्पादन खर्च प्रति लिटर चाळीस रुपये असताना 17 अधिक 5 रुपये प्रति लिटरची मागणी करून खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत अशी टीका शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी केली आहे. 

सांगली - दुधाचा उत्पादन खर्च प्रति लिटर चाळीस रुपये असताना 17 अधिक 5 रुपये प्रति लिटरची मागणी करून खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत अशी टीका शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी केली आहे. 

अशोक माने म्हणाले की, "राज्य सरकारने 27 रुपये प्रती लिटरचा आदेश काढला. त्याविरोधात सोनाई दुध संघाचे अध्यक्ष दशरथ माने व राज्यातील खाजगी दुध संघ वाल्यांनी एकत्रितपणे उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली. त्यावेळी खासदार गप्प बसले. पुणतांब्याच्या आंदोलनाच्या वेळी राज्यभर शेतकरी युती सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला असताना ते आंदोलन दडपण्यासाठी खासदारांच्या सहकाऱ्यांनी भूमिका बजावली. जयाजी सुर्यवंशी व आपण सुर्याजी पिसाळांची भुमिका बजावली. सुकाणू समीतीच्या आंदोलनात संपुर्ण कर्जमुक्ती, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी निलंगेकर समितीच्या अहवालानुसार व राहुरी कृषी विद्यापीठ यांच्या शिफारशी प्रमाणे दुधाला उत्पादन खर्चाप्रमाणे भाव मिळावा, अशा मागण्या आहेत. मात्र आपण आता शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहात.

बाजारातील पशु खाद्याचे दर व गाई म्हशींच्या खरेदींच्या किंमती या सर्व बाबींचा विचार केला असता दुध उत्पादकाच्या पदरात शेणसुध्दा उरत नाही. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आंदोलन करून दर मिळणार नाही. ही फक्त फसवणूक होईल.

Web Title: MilkAgitation ashok mane criticise on raju shetty