शेतकरी संघटनेच्या नेते व दुध संघ संचालकात खडाजंगी

MilkAgitation
MilkAgitation

मंगळवेढा :- सध्या दुध दरावरून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढून दुधाची खरेदी शासन निर्णयाप्रमाणे या मागणीसाठी जिल्हा दुध संघाच्या मंगळवेढा येथील डाॅकवर झालेल्या बैठकीत संचालक औदुंबर वाडदेकर व शेतकरी संघटनेेेनेचे अध्यक्ष रामचंद्र सारवडे यांच्यात खडाजंगी झाली दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दुधाला प्रतिलिटर तीस रू. दर व पाच रू. अनुदान या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून दुध दराबाबत तोडगा काढण्यासाठी संघाचे संचालक व तालुक्यातील दुध उत्पादक संस्थाचे अध्यक्ष यांच्यात बैठक झाली. यावेळी बैठकीस संचालक शिवाजी नागणे,संतोष कौडुभैरी, प्रकाश जुंदळे आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनेेेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र सारवडे म्हणाले,  शासनाने दि. 17 जुलै 2017 नुसार दुध 3.5 - 8.5 ला 27रू दर निश्चित केला. त्याप्रमाणे दर देण्याची मागणी केली.पण सध्या 17 रू दर दिला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना लुटले जात आहे. कायद्याची अमंलबाजणी होत नाही. शासन निर्णय शेतकरी काढत नसून शासन काढत आहे.त्याची अंमलबजावणी करता येत नसेल किंवा तेवढा दर देणे परवडत नसेल संघ बंद करा अशी मागणी केल्यावर संचालकाने संताप अनावर झाल्याने शासन निर्णयाची सुरळी करा असे वक्तव्य केल्याने उपस्थित संस्थाचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनेेेने प्रतिनिधीचा संताप अनावर झाला. याबाबतचा रेकॉर्ड सोशल मिडीयात व्हायलर झाल्याने या वत्यव्याबाबत पशुपालकातुन संताप व्यक्त केला जात आहे.

कमी दरामुळे पशुपालकाचे कंबरडे मोडले शासनाच्या निर्णयाप्रमाणे दाराची मागणी केल्यावर संचालकाडून जर अशी भाषा येत असेल वाढीव दाराची अपेक्षा कुणाकडून करायची ? 
- रामचंद्र सारवडे अध्यक्ष शेतकरी संघटना 


या बैठकीत शासननिर्णयाप्रमाणे राज्यात  कोण दर देते असे सांगा म्हणताच,  दर देणे परवडत नसेल कुलुप घाला असे व्यतव्य केले गेले आपण न बोललेले शब्द बोलल्याचे सांगून अपप्रचार केला जात आहे.
- औदुंबर वाडदेकर संचालक दुध संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com