आमदार रमेश कदमांची पोलिस कोठडीत रवानगी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, आमदार रमेश कदम यांना शुक्रवारी सोलापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

गुरुवारी सायंकाळी सोलापूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून आमदार कदम यांना ताब्यात घेतले. कदम यांना न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली, त्यानुसार न्यायालयाने कदम यांना 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या वेळी आमदार कदम यांनी न्यायालयासमोर स्वत: म्हणणे मांडले. त्यांनी त्यांच्या वकिलांना बोलू दिले नाही. गुन्ह्यात आपली चूक कशी नाही, हे पटवून देण्यासाठी त्यांनी मुद्दे मांडले. सुनावणीनंतर न्यायालय आणि पोलिस वर्तुळात कदम यांच्या युक्तिवादाची चर्चा होती.

काय आहे प्रकरण
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयातून 11 लाख 75 हजार रुपये सुनील सुभाष चव्हाण या नावाने सोलापूर कार्यालयाला पाठविले होते. ती रक्कम आमदार कदम यांच्या मोहोळ येथील कार्यालयात काम करणाऱ्या सुनील बचुटे याने काढून घेऊन वाहन खरेदी केले. या गुन्ह्यात बचुटेसह आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. चौकशीदरम्यान महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

Web Title: mla ramesh kadam's pc extended