मोहोळच्या नगराध्यक्षांनी क्रीडा संकुलासाठी दिली पाच एकर जमीन

राजकुमार शहा
बुधवार, 2 मे 2018

मोहोळ शहरासाठी क्रिडा संकुल मंजुर होऊन बरेच दिवस झाले. जिल्हयातील हे एकमेव क्रिडा संकुल आहे, जे जागेअभावी रखडले होते. मोहोळ शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक खेळाडु आहेत.

मोहोळ : मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी त्यांच्या स्व मालकीची पाच एकर जमीन शहरातील क्रीडा संकुलासाठी मोफत दिली. यामुळे क्रीडा संकुलाचा रेंगाळलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे. नगराध्यक्ष बारसकर यांचा आज 2 मे रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाची अनोखी भेट त्यांनी शासनाला देऊन अनेक खेळाडुंचे स्वप्न पुर्ण केले आहे. 

मोहोळ शहरासाठी क्रिडा संकुल मंजुर होऊन बरेच दिवस झाले. जिल्हयातील हे एकमेव क्रिडा संकुल आहे, जे जागेअभावी रखडले होते. मोहोळ शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक खेळाडु आहेत. ज्यांनी देशपातळीवर यश मिळवले आहे. मात्र त्यांना सरावासाठी जागा व पोषक वातावरण नव्हते. नगराध्यक्ष बारसकर यांनी ती अडचण ओळखुन स्व मालकीची पाच एकर जागा शासनाच्या क्रिडा विभागाला विना अट विना मोबदला दिली आहे. त्यामुळे क्रिडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागला आले. यामुळे खेळाडुत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मोफत जमिन दिल्याचे लेखी पत्र जिल्हा क्रिडाधीकारी युवराज नाईक यांना बारसकर यांनी प्रदान केले. यावेळी उपनगराध्यक्ष शौकत तलफ दार क्रिडाशिक्षक नंदकुमार देशपांडे संभाजी चव्हाण पैलवान भरत मेकाले आदी उपस्थित होते.

Web Title: Mohal municipal president gave five acres of land for sports complex

टॅग्स