‘मुद्रा’ने दिला 540 कोटींचा आधार

विशाल पाटील
सोमवार, 23 एप्रिल 2018

सातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात 82 हजार लाभार्थ्यांना 540 कोटींचा कर्ज पुरवठा विविध बॅंकांनी केला आहे. तरीही बहुतांश नागरिकांना त्याचा लाभ मिळाल्यास कुटीर, लघुउद्योजक वाढू शकतात. त्यामुळे कागदोपत्रांचा खोडा न घालता बॅंकांनी सढळ हात करणे गरजेचे आहे.

सातारा: तरुण, नवउद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बॅंक योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात 82 हजार लाभार्थ्यांना 540 कोटींचा कर्ज पुरवठा विविध बॅंकांनी केला आहे. तरीही बहुतांश नागरिकांना त्याचा लाभ मिळाल्यास कुटीर, लघुउद्योजक वाढू शकतात. त्यामुळे कागदोपत्रांचा खोडा न घालता बॅंकांनी सढळ हात करणे गरजेचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विना जामीन व विनातारण अशी मुद्रा बॅंक (मायक्रो युनिटस डेव्हलपमेंट एण्ड रिफायनान्स एजन्सी) या कर्ज योजनेची सुरवात एप्रिल मध्ये केली. सातारा जिल्ह्यात सुमारे बॅंकांनी शिशू, किशोर, तरुण या प्रवर्गात कर्जांचा पुरवठा केला आहे. गत आर्थिक वर्षात 82 हजार 347 लाभार्थ्यांना 540 कोटी 70 लाखांचा कर्जपुरवठा केला गेला. त्यामध्ये एकट्या स्टेट बॅंकेने 142 कोटींचा, त्यापाठोपाठ महाराष्ट्र बॅंकेने 82 कोटींचे कर्ज वितरण केले आहे. त्यामुळे त्यांना व्यवसाय, उद्योग उभारणीसह वाढविण्यासाठी आर्थिक हातभार लाभला आहे.

दरम्यान, या योजनेत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांपेक्षाही कित्येकपट्टीने कर्जाची मागणी होत असते. अनेक युवकांनी या योजनेतून 'अच्छे दिन'ची स्वने बघितली; परंतु प्रत्यक्ष कागदपत्र हातात घेऊन बॅंकेत गेल्यावर व हेलपाटे मारल्यावर पदरी निराशा पडत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायाला प्रारंभ करताना प्रामुख्याने भांडवलाची अडचण येते. कोणत्याही बॅंका तारण असल्याशिवाय त्यांना उभे करीत नाहीत. पतसंस्था अथवा खासगी सावकारी परवडत नाही. त्यामुळे मनाची तयारी, कष्ट करण्याची क्षमता असूनही नाईलाजाने लहानसहान नोकरीवर धन्यता मानावी लागते.

बॅंकांवर कारवाई करा
मुद्रा योजनेची जाहिरातही मोठ्या प्रमाणावर केली गेली. त्यामुळे तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या. ते बॅंकांत गर्दीही करत आहेत. परंतु, बहुतेक बॅंका कर्ज देण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. मुद्रा समन्वय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतानाही त्यांनीही तंबी दिली तरी त्याची दखल घेतली जात नसल्याचे बोलले जाते. ते थांबविण्यासाठी संबंधित बॅंकांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणे आवश्‍यक आहे, अशी मागणी होत आहे.

मुद्रा कर्जवाटप...
कर्ज प्रकार लाभार्थी संख्या कर्जाची रक्‍कम (कोटी)

शिशू कर्ज...........72419................177
किशोर कर्ज...........8220................237
तरुण कर्ज............1708..................125

Web Title: mudra 82000 new business