सातारा येथे किरकोळ वादातून एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

सातारा : सातारारोड (ता. कोरेगाव) येथे मध्यरात्री किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. संतोष दशरथ गायकवाड (रा. बोरखळ, ता. सातारा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड यांचा खेळणी विक्रीचा व्यवसाय आहे. गावागावच्या यात्रेत ते खेळणी विकतात. मंगळवारी (ता. 9) मध्यरात्री सातारारोड येथील मद्य विक्री दुकानानजीक गायकवाड यांची दोन जणांशी वादावादी झाली. त्याचे पर्यवसन मारामारीत झाले. गायकवाड यांना सातारामधील जिल्हा रुगणालयात आणले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोरखळमधील दोघांना संशियत म्हणून सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.