प्राचीन ठेवा पाहण्यासाठी तुडुंब गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

कोल्हापूर - टाऊन हॉलमधील प्राचीन वस्तुसंग्रहालय आज कुतूहलमिश्रित गर्दीने तुडुंब भरून गेले. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त अनेकांनी कोल्हापूरच्या प्राचीन संस्कृतीची माहिती घेतली. विशेष म्हणजे अंध मुलांनीही केवळ स्पर्शावरून प्राचीन मूर्तींचे अस्तित्व जाणून घेतले.अनामप्रेम या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या मुलांसह संग्रहालयाला भेट दिली. या मुलांनी संग्रहालयाचे अधीक्षक अमृत पाटील यांना ब्रेल लिपीत शुभेच्छा दिल्या. 

जागतिक संग्रहालय दिनानिमित्त आज टाऊन हॉल व चंद्रकांत मांडरे कलादालन पाहण्यास सर्वांना मोफत प्रवेश होता. सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच संग्रहालय पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. टाऊन हॉल संग्रहालयातील प्राचीन वस्तू,अलंकार, देव-देवतांच्या मूर्ती, शिल्पाकृती, चित्रकृती, शस्त्रे, जुन्या काळातील भांडी व कोल्हापूरच्या इतिहासाचे टप्पे सांगणारी माहिती पाहून अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. चंद्रकांत मांडरे कलादालनातही सकाळपासून गर्दी झाली.मांडरे यांच्या मराठी सिनेसृष्टीतील विविध भूमिकांची छायाचित्रे, त्यांना मिळालेले पुरस्कार,त्यांनी साकारलेल्या विविध कलाकृती या संग्रहालयात आहेत. त्याची माहिती सर्वांनी जाणून घेतली.

Web Title: Museum day